Posts

Showing posts from August 9, 2024

टी माधव पै

एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ खुलभर दुधाची कहाणी तुम्ही  सगळ्यांनीच वाचली असेल.  पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य. गाभारा दुधाने भरून वहायला लागतो.  या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की नव्या यूगाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्या आज्जीबाई सारखं कोणी तरी मार्गदर्शन करायला हवं.  अशीच एक पेला दुधाची कहाणी  आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही कथा आहे  *तोन्से माधव अनंत पै* यांची.  कर्नाटकात ल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या तोन्से माधव अनंत पै यांचं शिक्षण लवक...

आयुष्यातील दोन गुरू

 ******************************** *आयुष्यातील दोन गुरू - अपमान आणि पोटाची भूक* ******************************** *~ नाना पाटेकर ~* वयाच्या तेराव्या वर्षी, १९६३ ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला ३५ रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता. रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई नि वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा. अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. ...

फुलं

सकाळ सुंदर होती. प्रसन्न, ताजी, नवी,  टवटवीत.  पक्ष्यांची किलबिल,  थंड हवा,  निरवता पण सजीवता, दंवात भिजलेली, हसरी,  मोहमयी,  हिरवी हिरवी.  मी अंगणात आले.  कोपऱ्यातलं एक झाड कसं आळस झटकून ताजं  ताजंतवानं झाल्यासारखं हसत होतं… इतक्यात माझं लक्ष गेलं. हेच ते गृहस्थ. गेले काही दिवस आमच्या झाडांची फुलं गुपचूप काढून नेत असतात. नेहमी ते लवकर येतात. मी त्यावेळी आमच्या बेडरूमच्या खिडकीतून  बागेकडे बघत असे. आज मात्र त्यांना थोडा उशीर झाला होता आणि मी थोडी लवकर उठून बागेत  माझ्या आवडत्या जागी बसायला आले होते. मी पटकन थोडी आड बाजूला गेले. ते गृहस्थ, बहुतेक त्यांनी मला बघितलं नसेल, पुढे आले. आमच्या कुंपणाच्या पलिकडे  गेलेल्या फांद्यांवरची फुलं तोडू लागले. मला त्यांचा अतीशय राग आला.  "का हो, आमच्या झाडाची फुलं तोडायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला?"  मी एकदम पुढे जाऊन जोरात म्हटलं. ते  दचकले. गांगरले. अपराधी भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. पण मला ते घाबरलेले मात्र  वाटले नाहीत. मला म्हणाले, " माफ करा. मला फुलं चोरून नेण्याची ...

मोबाईल

 मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं.....? आजच्या काळात खासकरून कोविडनंतर मोबाईलच्या अतिवापरामुळे स्क्रीन ॲडिक्शन खूप वाढले आहे.  पालक, शाळा, सायकॉलॉजिस्ट, डॉक्टर्स या सगळ्यांकडून हेच सतत ऐकायला मिळते.  याचे कारण मोबाईल ॲडिक्शन हा प्रकार फक्त अभ्यासावर किंवा फक्त तब्येतीवर परिणाम करत नाहीत तर तो झोप, तब्येत, अभ्यास, नातेसंबंध, आत्मविश्वास, आनंद, समाधान, ध्येय या सगळ्याच गोष्टींवर नकारात्मक परिणाम करतो आणि म्हणून स्क्रीन ॲडिक्शनच्या कारणांचा, परिणामांचा आणि उपायांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. मोबाईलच्या एका क्लिकवर शॉपिंग, ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिंज वॉचिंग, गेम्स, रिल्स, व्हाॅट्सॲप, सोशल मीडिया, पोर्नोग्राफी असे अनेक पर्याय मोबाईलच्या मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला बघायची नसेल तरीही ती इतक्यांदा स्क्रीनवर पॉप-अप होत राहते की कधी ना कधी कुठे ना कुठे सहज बघावं म्हणून क्लिक केलेल्या गोष्टीची कधी सवय लागून जाते हे कळत देखील नाही. तुम्ही जे बघता त्या सर्व गोष्टींचा अलगोरीदम फोन सेव...

मदत

                  शाळेने पत्रक काढलं - यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल ! आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.  मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, "मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, "सर आपल्य...

मूर्तीपूजेचे महत्त्व

 🔵 बोधकथा*🔵        ••◆•◆•◆★◆•◆•◆••      स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.    रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चो...

कुटुंब प्रमुख

 कुटुंब प्रमुखाला का जपायच छान लेख ? गावातलं एक शेतकरी कुटुंब. आई वडील व तीन मुले, त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब. वडील शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक व मेहनती, एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढं आणलेलं. मुलंही चांगली निघाली. नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एकजिनसी राहू लागल्या.  मात्र घरातली कामे कोणती कुणी करायची, यात गोंधळ होऊ लागला. आणि कामे खोळंबु लागली. एकीला वाटायच की हे काम मी का करू ? धाकटीने करावं. असं इतर दोघीनाही वाटायच अन त्यात गुंता वाढत गेला.  वडिलांनी (म्हणजे सासऱ्यांनी) हे सगळं पाहिलं अन एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलावून घेतलं. स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या चौघीत कामाबद्दल चक्क वाटणीच त्यांनी करून दिली. ते म्हणाले, "सर्वात लहान सून... हौशी आहे, नव्या काळातली आहे. आहार विहार कसा असावा हे शिकलेली आहे. तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिने पाहायचा. बाकी दिवसभर मग तिने वाटलं तर इतरांना मदत करावी मात्र त्याची सक्ती नाही. बाकी वेळ ती आराम देखील करू शकेल." मधली सून.... नीटनेटकी आहे. टापटीप आहे. तर आजपासून तिने घरची धुणी भांडी पाहायची. बाकी का...

आंगणेवाडी जत्रा

        *(मालवणी भाषेत)*    दक्षिण काशी म्हणून ओळख असलल्या आंगणेवाडीतली श्री भराडी देवीची जत्रा शनिवार तारीख 2 मार्च 2024 या दिवशी  होऊची  आसा. पेपर, टी.व्ही., मोबाईल मूंबैतले भिंती  अशा सगळ्याभर रंगवन, पोस्टर लावन या जत्रेची भरपूर प्रसिद्धी मुंबैत रवणार्‍या गाववाल्यांनी दिल्लली आसा.   **आंगणेवाडी* ह्यो  गाव म्हणजे  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या  मालवण तालुक्यातल्या *मसुरे* या गावच्या 12 वाडींपैकी एक वाडी. लयतलय 380 ते 400 कच्च्या आनि पक्क्या घरांचो  ह्यो गाव मालवण या तालुक्याच्या ठिकाणापासून 12 कि.मी. अंतरावर आसा. लोकसंख्या  लयतलय  हजारभर. तेतुरली बरीच जना पोटापानियासाठी मुंबैक जावन  रवल्यामुळे गाव तसो खालीच. गावात शाळा एकच.      असो  ह्यो  गाव डोंगरार  वसललो.सगळीकडे कातळ जमीन. शेत जमीन  नावाकव नाय.मातर आंबो, काजू, रतांब्याची   झाडा मातर माॅप.     सगळी भरड जमीन. अशा या गावात  *भरडावर* ह्या देवीचा सुरेख संगमरवरी देऊळ  आसा.    ...

छत्रपती शिवाजी महाराज

 *छत्रपती शिवाजी महाराज* म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....! 1.अफजलखानाचा कोथळा  2.शाईस्तेखानाची बोटे  3.आग्राहून सुटका पण मला भावलेले *छत्रपती शिवाजी महाराज* अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....! 1.आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे  *" छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती*" करणारे होते...! 2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे *"लोकपालक" राजे* होते...! 3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे *"उत्तम प्रशासक"* होते...! 4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे *"पर्यावरण रक्षक"* होते...! 5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे *"स्व-धर्मचिकित्सक"* होते ...! 6. मुहूर्त न पाहता , अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  *अंधश्रध्दा निर्मुलनाचा संद...

संवाद

खरंतर मेन्यू कार्डची त्याला  उत्सुकता, प्रतीक्षा असते.  कार्डावर बारकाईनं नजर टाकून  तो वेटरला ऑर्डर देतो… थोड्या वेळानं तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ  आणि सोबत एक सुंदर तरुणी घेऊन येतो! समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते.  _“हॅव ए गुड टाइम… एन्जॉय!”_ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.  टेबलावर ते दोघंच… अनोळखी, अपरिचित… काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघंही एकमेकांचा परिचय करून देतात.  या जुजबी ओळखीपाळखीनंतर  तिच्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद  हळुवारपणे रंगत जातो…   उभयतांच्या गप्पांचा फड  चांगलाच रंगलेला असतानाच  वेटर बिल घेऊन येतो… दोघांचाही हिरमोड होतो _“पुन्हा भेटू…!”_ म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन  तो हॉटेलबाहेर पडतो! *‘लिसनर’* नावाच्या शॉर्टफिल्मचं  हे संक्षिप्त कथानक… जगभर ही फिल्म दाखविली गेली  आणि तितकीच नावाजलीही गेली! ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता  अमेरिकेतल्या वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या  *'ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी'*  या जर्न...

सोनेरी शिक्षा

      मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते. मधली सुट्टी देते तो आनंदविसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता.        स्टाफरूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या. चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या चर्चाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगतीपुस्तके काढून घ्यायला उठले होते. एवढ्यात पाचवीतली एक मुलगी रडत रडत आत आली. "बोकील बाई कुठेत?" असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा अल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या पायरीवर बसले, तिला शेजारी बसवलं. तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायचा प्रयत्न करत होते. पाचवीतली ही मुलगी माझ्याकडे का आलीय ते मला कळत नव्हतं. कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते.         हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्याप...

सुखी माणसाचा सदरा

रस्त्याच्या कडेला झगमग करणाऱ्या दोन-चार दुकानांच्या पुढे वळणावर, पंधरा सोळा वर्षाचा मुलगा शर्ट विकत होता. कधी १०० ला एक तर कधी २०० ला तीन ओरडताना तो दिसायचा. संध्याकाळी साधारण पाच ते नऊ दरम्यान, मी त्याला न चुकता गेली सहा महिने तिथे बघत होतो. अतिशय बोलका आणि मनमिळावू असल्याने त्या चादरीवर मी एखादा शर्ट दोन आठवड्याच्या वर कधी पाहिला नाही. त्याच्या परिस्थितीची काजळी त्याच्या पेहरावावर कधीच दिसली नाही पण स्व:कष्टाचा स्वाभिमान हा मात्र त्याच्या चेहर्‍यावर एखाद्या दागिन्यासारखा लख्ख चमकत असायचा कधीकधी आमचा एकमेकांना हाय-बाय ही व्हायचा पण गेली दोन-तीन दिवस झाले ना ती चादर दिसली ना तो. कुतुहल म्हणून त्याच कोपऱ्यावरच्या चहावाल्याला विचारलं, म्हणाला "दोन-तीन दिवसांपूर्वी अतिक्रमण पथकानं त्याचं दुकान उचललं म्हणे , पाच सहा हजाराचा माल होता. बिचाऱ्या पोराचं नुसकान!". "पण कधीतरी हे होणारच होतं, दुसऱ्याचं चांगलं थोडीच बघवतं हितं", "जाऊ दया, चहा घेणार का?" चहाचे दोन-तीन घोट शांततेत गेले. मी त्याच्या शाळेचा पत्ता काढला, दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकून शाळा गाठली. समजलं की ती र...

खाणे

 🫢🫢🫢🫢🫢🫢🫢 खाणे जे पोटात कधीच जात नाही 🤔..... खाण्याचे काही विशेष वेगळे प्रकार आहेत, जे प्रत्यक्षात आपल्या पोटापर्यंत पोचतच नाहीत, अशा प्रकारांची आज आपण माहिती घेणार आहोत... लहानपणी आपण रोज आई वडील आणि शिक्षकांचा मार खातो!  पण आपण शहाणे असलो तर शब्दांचा खाल्लेला मार आपल्याला पुरतो. आपण आयुष्यभर मधून मधून इतरांचा वेळ आणि डोके खातच असतो. काही लोक इतरांवर खार खातात तर काही अकारण भाव खात असतात! काही विशेष कर्तबगार लोक तर पैसा पण खाऊ शकतात! आणि त्यांचे खाणे उघडकीस आले तर लोक त्यांना, "काय माती खाल्लीस" असे म्हणतात!!! शिव्या तर आपण रोजच कुणाच्या ना कुणाच्या खात असतो. पण त्यामुळे आपला जो अपमान होतो तो मात्र खाता येत नाही. तो आणि आलेला राग दोन्ही गिळावे लागतात. कधी कधी मात्र उलटे होते. जी व्यक्ती अपमान करते, तिलाच तिचे शब्द गिळावे लागतात! काही लोक तर राग आला की दात ओठ पण खातात! या खाण्याच्या प्रकारात काही अभक्ष्य भक्षणाचे प्रकार पण आहेत, उदाहरणार्थ..  जीव खाणे, भेजा खाणे ई. बरीच माणसं नको तिथे कच खातात!  काही लोकांच्या मृत्यू चं कारण पण खाणच असतं, पण त्याला हाय खाणं म्...

मराठी भाषेचे लडिवाळ लेणे:कोल्हापूरी शिव्या

         कोल्हापूरकरांना शिवीचे कौतुक नाही कारण कोल्हापुरात कुणाच्याही तोंडी या दोन शिव्या नक्की असतात एक म्हणजे रांडच्या व दुसरी च्यायला. आता इथे एक आहे ज्यांना अश्लील अश्लील म्हणून नाक मुरडायचे असतील त्याने हा लेख वाचण्याच्या फंदातच पडू नये. पण मला खात्री आहे सच्चा कोल्हापूरकर हा लेख चवीने वाचणार याची.       खरंतर शिवी ही अचानक तोंडातून जाणारी गोष्ट आहे. कारण तुम्ही नीट व सावकाश तेही डावीकडून गाडी चालवत आहात व विरुद्ध बाजूने एखादा सुसाटत आला आणि तुमच्या आडवी गाडी घातली, तर ब्रेक तर तुम्ही दाबताच, पण त्याच क्षणी तुमच्याही न कळत तुमच्या तोंडून शिवी बाहेर पडते. ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, कारण तुम्ही तुमचा राग कमीत कमी शब्दात समोरच्या माणसावर काढलेला असतो .तोही कोल्हापुरी असला तर त्याची परतफेड नक्कीच करतो.     त्यामुळे असे खूप  प्रसंग मराठी साहित्यात जागोजागी आढळतात जिथे कोल्हापूर आणि शिव्या यांचा संबंध दाखवला गेला आहे. पण इथे असेच नाही, तर महाराष्ट्रात इतरत्रही ,अगदी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही, इरसाल सदाशिव पेठी किंव...

अशी पाखरे येती

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित)  पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया.  बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली.  बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या...!' भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच.  कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली.  त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले. बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते.  आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या... मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याक...