Posts

Showing posts from September 13, 2024

महाराणी येसूबाई

*!!!  महाराणी येसूबाई  !!!*                   भाग - २५.                   खरोखर शंभूराजेंनी मराठा गोळा करण्याची कोशिश केली असती तर, ही स्वार्थी मतलबी मंडळी शंभूराजे विरुद्ध खवळून उठली असती. व " बंडाचे" नाव दिले असते. सोयराबाईही त्यांच्या मागे उभे राहिल्या असत्या. आबासाहेबांना मजबूर होऊन समशेर उपसावी लागली असती. जिच्या एकाच घावात शाहिस्तेखान्यांला आपली बोटे गमवावी लागली. ती समशेर कदाचित स्वपुत्राच्या रक्ताने....              येसूबाईंना ती कल्पनाही सहन झाली नाही. येसू, म्हणूनच आम्ही आमच्या माणसांना दूर ठेवले. व आमच्या मनसुब्याचा कोणाला पता लागू दिला नव्हता. दिलेरने शब्द दिला आणि आम्ही त्याच्यावर पुरा यकीन करून दोस्त मानले. पण येसू, काटा तो काटाच. टोचणे हा त्याचा गुणधर्म. भुजंगच तो  जहर ओकणे त्याचा स्वभावधर्मच. हमेशाप्रमाणे दिलेर यवनाने हरामखोरी केलीच. येसू, आजही तो भोपाळगडचा किल्ल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. भुपाळगडावर दिलेरखानने हल्ला केला. दौलतीवर हमला...