Posts

कर्म

 हे एकदा वाचा ........कर्म..... “आयुष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या.... माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ...आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले. रिटायरमेंटपर्यंत एकही इनक्वायरी नाही की कसली चौकशीही नाही. खाल्लेला पै न पै नीट पचवून, इन्वेस्ट्मेंट करुन आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करुन पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते. कसलीही ददात नाही की काही नाही....वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य. रोज स्कॉच आणि सिगारेटी वगैरे असूनही तब्येत धडधाकट. सहा परदेशप्रवास, आलिशान कार, मुलाचा बिझनेस...मज्जानू लाईफ. एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे आले. पत्रिका दाखवायला... बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले. मला समजेचना...मग विषयाला हात घातला. ते त्यानंतर जे काही...

अविधवानवमी

 *🔸.🔸* ====================== ====================== *"आजी कपाटाची चावी हवी आहे मम्मीला"...मी मोबाईल बघत बघत आजीला म्हटंले.* *"अरे! चावी मी काय कमरेला लावून फिरते का? फळीवर असेल बघ ना... मला आता आयुष्यात रस नाही उरलाय, तिथे कपाटाच्या चावीत काय रस असणार"..* *आजीने जरा चिडूनच मला उत्तर दिले.* *आजीचा चिडलेला स्वर ऐकून आजोबांनी घाईघाईत फळी वरील चावी माझ्या हातात देत म्हंटले,* *"तिचा उपास आहे ना आज... त्यामुळे भुकेने थोडी चिडचिड झालीय तिची. आणि तुझ्या मम्मीची पण कमाल आहे. चावी मागायची कशाला... अरे जेव्हा पाहिजे तेव्हा फळी वरून आम्हाला न विचारता सरळ घ्यायची की ".... आजोबांनी आजीला आज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. तितक्यात आजी पुन्हा चिडचिड करत म्हणाली,* *"उगाचच माझ्या भूकेच खोटं कारण सांगू नका. आठ महिन्यांपूर्वीच माझी भूक मेली आहे...."आजी पुढे काही बोलायच्या आत आजोबांनी मला खुणेनेच निघून जायला सांगितले.* *मी चावी मम्मीला नेवून दिली आणि आजीची चिडचिड सुध्दा सांगितली.* *मम्मीने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि ती कपाटाच्या दिशेने गेली.* *तसं तर आम...

माणसात देव शोधा

 💫  ** 💫 ➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖    एका गावात एक मंदीर होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले.      मंदिराच्या पुजाऱ्यास न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, "पुजारी चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल.      पुजारी म्हणाले, ''मला माझा देवच येऊन वाचवेल.''  जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली .बोटीतील लोक पुजारींना न्यायला आले. पुजारींनी नकार दिला.पाणी इतके वाढले की पुजारींना मंदिराच्या कळसावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरून घिरट्या घालू लागले.त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टर मधले लोक म्हणाले, ''पुजारी आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.''       पुजारी म्हणाले, ''माझा देवच मला येऊन वाचवेल.''      यानंतर एकच मोठी लाट आली आणि पुजारी मृत्यमुखी पडले.स्वर्गात गेल्यावर त्यांनी देवाला विचारले, ''मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.''      देव म्हणाला, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो,नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'   *बोध*   ...

तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

** -----------------------------  --डॉ.श्रीमंत कोकाटे -----------------------------                         "रयत" हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. मूळ अरबी भाषेतील असणाऱ्या शब्दाने मराठी भाषिकांना आकर्षित केले आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजीराजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.                               छत्रपती शिवाजीराजांनी कृषी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समतेचा पाया घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू ठेवली.                                 कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्...

ऑफर

 ** ➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖ कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ‘ती’ आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला ‘तो’ ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते. विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफॉमन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’ त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, ‘‘मी हे अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. ‘नोकरी सोडणं’ इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’ पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ त्याच्यासमोर ठेवत  म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासाठी वर्षभर तुला ...

मन मोठं पाहिजे

 ** 🌹 ➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖ सलाईन लावलेल्या आईजवळ लग्नानंतर 10 वर्षांनी रसिका निवांत बसली होती... आई सोबत नेहमी मुलगी म्हणून गप्पा मारणारी *ती* आज वेगळ्या भूमिकेतून गप्पा मारत होती... "आई मला आठवतं तू बऱ्याच वेळा बाबांवरून कुरकुर करायचीस... *एवढं आयुष्यभर मी ह्यांना साथ दिली. पण, कधी शब्दाने कौतुक नाही ह्यांना...* तू चिडून बडबड करायचीस त्यांच्या माघारी. मी लगेच उफळायचे तुझ्यावर, "काय ग? नाही तर नाही... काय बोलूनच दाखवलं पाहिजे का"? तू म्हणायची तुला नाही कळणार बाई... *"ज्याच्यासाठी रक्ताची नाती सोडून आलो* ... *संसाराची होता होईल तेव्हढी जबाबदारी पेलून धरतोय* ... *जमेल तेवढी साथ देतोय* , *त्याच माणसाला कौतुक नसेल तर सगळं करणं मातीमोल वाटतं* ... मी मग माझ्या बाबाची कड घेऊन वाद घालायचे शेवटी तूच माघार घ्यायची... खरंतर शिक्षण नसताना तू केलेलं मशीन काम कुठंतरी संसाराचा भार पेलतच होतं... धुणी भांडी घरीच करत होतीस मग ते हि पैसे वाचत होते... पण बाबा मात्र अहंकाराने सतत म्हणायचे मीच ओढतो संसाराचा गाडा... मी रक्त जाळतो आठ-आठ तास म्हणून चाललं आहे... बाबांच्या धाकाने तू त्यांच्या प...

महाराणी येसूबाई

*!!!  महाराणी येसूबाई  !!!*                   भाग - २५.                   खरोखर शंभूराजेंनी मराठा गोळा करण्याची कोशिश केली असती तर, ही स्वार्थी मतलबी मंडळी शंभूराजे विरुद्ध खवळून उठली असती. व " बंडाचे" नाव दिले असते. सोयराबाईही त्यांच्या मागे उभे राहिल्या असत्या. आबासाहेबांना मजबूर होऊन समशेर उपसावी लागली असती. जिच्या एकाच घावात शाहिस्तेखान्यांला आपली बोटे गमवावी लागली. ती समशेर कदाचित स्वपुत्राच्या रक्ताने....              येसूबाईंना ती कल्पनाही सहन झाली नाही. येसू, म्हणूनच आम्ही आमच्या माणसांना दूर ठेवले. व आमच्या मनसुब्याचा कोणाला पता लागू दिला नव्हता. दिलेरने शब्द दिला आणि आम्ही त्याच्यावर पुरा यकीन करून दोस्त मानले. पण येसू, काटा तो काटाच. टोचणे हा त्याचा गुणधर्म. भुजंगच तो  जहर ओकणे त्याचा स्वभावधर्मच. हमेशाप्रमाणे दिलेर यवनाने हरामखोरी केलीच. येसू, आजही तो भोपाळगडचा किल्ल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. भुपाळगडावर दिलेरखानने हल्ला केला. दौलतीवर हमला...