Posts

Showing posts from September 19, 2024

मन मोठं पाहिजे

 ** 🌹 ➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖ सलाईन लावलेल्या आईजवळ लग्नानंतर 10 वर्षांनी रसिका निवांत बसली होती... आई सोबत नेहमी मुलगी म्हणून गप्पा मारणारी *ती* आज वेगळ्या भूमिकेतून गप्पा मारत होती... "आई मला आठवतं तू बऱ्याच वेळा बाबांवरून कुरकुर करायचीस... *एवढं आयुष्यभर मी ह्यांना साथ दिली. पण, कधी शब्दाने कौतुक नाही ह्यांना...* तू चिडून बडबड करायचीस त्यांच्या माघारी. मी लगेच उफळायचे तुझ्यावर, "काय ग? नाही तर नाही... काय बोलूनच दाखवलं पाहिजे का"? तू म्हणायची तुला नाही कळणार बाई... *"ज्याच्यासाठी रक्ताची नाती सोडून आलो* ... *संसाराची होता होईल तेव्हढी जबाबदारी पेलून धरतोय* ... *जमेल तेवढी साथ देतोय* , *त्याच माणसाला कौतुक नसेल तर सगळं करणं मातीमोल वाटतं* ... मी मग माझ्या बाबाची कड घेऊन वाद घालायचे शेवटी तूच माघार घ्यायची... खरंतर शिक्षण नसताना तू केलेलं मशीन काम कुठंतरी संसाराचा भार पेलतच होतं... धुणी भांडी घरीच करत होतीस मग ते हि पैसे वाचत होते... पण बाबा मात्र अहंकाराने सतत म्हणायचे मीच ओढतो संसाराचा गाडा... मी रक्त जाळतो आठ-आठ तास म्हणून चाललं आहे... बाबांच्या धाकाने तू त्यांच्या प...