Posts

Showing posts from October 8, 2024

कर्म

 हे एकदा वाचा ........कर्म..... “आयुष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या.... माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ...आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले. रिटायरमेंटपर्यंत एकही इनक्वायरी नाही की कसली चौकशीही नाही. खाल्लेला पै न पै नीट पचवून, इन्वेस्ट्मेंट करुन आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करुन पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते. कसलीही ददात नाही की काही नाही....वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य. रोज स्कॉच आणि सिगारेटी वगैरे असूनही तब्येत धडधाकट. सहा परदेशप्रवास, आलिशान कार, मुलाचा बिझनेस...मज्जानू लाईफ. एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे आले. पत्रिका दाखवायला... बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले. मला समजेचना...मग विषयाला हात घातला. ते त्यानंतर जे काही...