छत्रपती शिवाजी महाराज
*छत्रपती शिवाजी महाराज* म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले *छत्रपती शिवाजी महाराज* अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे *" छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती*" करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे *"लोकपालक" राजे* होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे *"उत्तम प्रशासक"* होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे *"पर्यावरण रक्षक"* होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे *"स्व-धर्मचिकित्सक"* होते ...!
6. मुहूर्त न पाहता , अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून *अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश* देणारे *चिकीत्सक राजे*
7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली *शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था* आजही तितकीच प्रभावी आहे ! *जलतज्ञ राजे* *छत्रपती शिवराय*!!
8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे तब्बल ४५० गडकिल्ल्यांचे निर्माते , *उत्तम अभियंते राजे*
9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत *सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे*!!
10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे *मातृभक्त , नारीरक्षक छत्रपती शिवराय*
खर्या अर्थाने ते *"लोकराजे"* होते कारण ते सर्व धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी *शिवशाही* होती.....!
Comments
Post a Comment