मन रिचार्ज,रिचार्ज...!
*मन रिचार्ज,रिचार्ज...!!!*♥️ मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच. रविवार...निवांत, आरामाचा दिवस...आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती. सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज 'लो बॅटरी'.. चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती. अरे बापरे...?? काय करावे तेच सुचेना... मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो. माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?” “नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले. “मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो,इतके त्याला जपतो.. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?” पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते. “मनाचे चार्जिंग ?? हे काय नवीन.???” “नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अ...