Posts

Showing posts from August 10, 2024

आईची तिजोरी

अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त् यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शीलकी रहायची ती आई बचत करून ठेवायची...  घरात एक गोदरेज कपाट सार्वजनिक...! आई अण्णा.. आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळुन सात जणांमध्ये ते बिचारं तीन बाय सहाच गोदरेजचं लोखंडी कपाट स्वतःहून समर्पित झालेलं असायचं आम्हाला... शिवाय काचही फुटलेली त्याची...! गेल्या 25 वर्षात त्याला परत काच लागली नाही...!  तो काळ ही तसाच होता... अण्णा शिक्षक... त्याकाळी पगार कितकासा राहणार?  त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा होता शिक्षकी..!  घरखर्च, पाच जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची... म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते. अण्णांचा पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...!  *कुणाचा हात पोहोचू शकणार नाही ...

उंबरा

 *उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान...!!!* उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) उंबराचा वृक्ष.  म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे.  उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली.  औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पुजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स...

ऋण

➖➖➖➖➖➖ पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या 'आशा दीप' नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधून मधून पोस्टमन येउन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा,  तेंव्हा हे ठरावीक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या अविर्भावात,  बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेउन वाचत बसलेले असत.  किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत.  त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली 'देशमुख काका... तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेउन जा..' तेंव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच.  'आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?' असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात 'बार' भरला होता. मानेनेच 'जाउन या..बघा काय आलय..' असे नानांनी अप्पांना सुचवले तसे अप्पा देशमुख लगबग ऑफिसमधे आले. रजिस्...

कर्तव्य

       बाजारातल्या कोपऱ्यात बसून उम्या आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. "अरे ही चप्पल शिवायची आहे"      समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली. "तुम्ही चोरगे सर ना?" त्याने विचारलं. "हो. तू?"       "मी उम्या, उमेश कदम. कल्याणी शाळेत दहावी अ च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी  शिकवायचे."       "बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" चोरगे  सर त्याला निरखत म्हणाले.       "असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन." "पण तू हा व्यवसाय का.....?"        "सर हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावी सुटलो तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय." "काय झालं वडिलांना?        "सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात." "ओह! आणि तुझे भाऊ?" "दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आह...

पराभव

जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की, "आपण ग्रामीण भागात जास्त लक्ष द्यावे." बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठी काढायचे. लगेच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही डोंगराळ व जंगली भागही होते. एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले की एका डोंगराळ भागात 'बडेरी' नावाचे एक गाव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटरपर्यंत डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे. मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे. तिथे कोणीतरी पी. के. व्यास हे मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि का कोण जाणे, ते पद सोडायचंही नव्हते. मी आदेश दिला की "त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये. ही अचानक भेट असेल." दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहनचालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जाव...

बोधकथा

*एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर.....तीन्ही भावांसह फिरत असता श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं , "एक गोष्ट विचारू दादा? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला.  अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास ?"* *यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले,  "तुला माहित आहे भरता !!  एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या  पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता ?"* *यावर भरताचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "हा तर मोह आहे दादा; आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू क...

अनवाणी

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा.  एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, *"पोस्टमन ssssss"* आतून एका मुलीचा आवाज आला, "जरा थांबा, मी येतेय" दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली.  दार काही उघडेना.  शेवटी पोस्टमन वैतागला आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे" आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते" *पोस्टमन.... "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"* पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले.  दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !!  दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती.  काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता.  हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला. असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते.  दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय.  ती काही बोलली नाही.  म...

गणितातील चमत्कार

 गणितात अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी  नि:शेष भाग जातो. अशी कोणतीही संख्या नाही असेच बहुतांश जणांचे म्हणणे होते.  पण हा एक आकडा खूपच विचित्र आहे आणि जगातील सर्व गणितज्ञांना धक्का बसला आहे. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.  ही संख्या २५२० पहा.  ही अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,  ….  तथापि, प्रत्यक्षात तसे नाही, २५२० ही अशी संख्या आहे, ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.  २५२० या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने नि:शेष भाग जातो.  सम किंवा विषम:  हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य असल्यासारखे वाटते.  आता, खालील तक्ता पहा;  २५२० ÷ १ = २५२०  २५२० ÷ २ = १२६०  २५२० ÷ ३ = ८४०  २५२० ÷ ४ = ६३०  २५२० ÷ ५ = ५०४  २५२० ÷ ६ = ४२०  २५२० ÷ ७ = ३६०  २५२० ÷ ८ = ३१५  २५२० ÷ ९ = २८०  २५२० ÷ १० = २५२  २५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] च्या गुणाकारात लपलेले आहे. भारतीय हिंदू वर्षाच्या स...

वेडे" होऊन जगा...!

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता. आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले. सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला. रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे.... किती छान ना. हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच ...

वठलेला वृक्ष

'सहा हॉस्पिटल्स फिरूनही बेड मिळाला नाही. त्यामुळे रोगी अँब्युलन्समध्ये गेला.' 'आमच्या वडिलांना हृद्यविकाराचा झटका आला. हॉस्पिटल म्हणालं, "कोविडची टेस्ट करा. मग ऍडमिट करू." ती करेपर्यंत वडील गेले.' 'मजबुरीत खाजगी रुग्णालयात जावं लागलं, त्यांनी वाट्टेल ते बिल केलं.' 'अँब्युलन्स आलीच नाही.' या आणि अशा अनेक कथा आता ऐकायला मिळताहेत. केवळ उपचाराअभावी काही माणसं गेली. अशावेळी पहिला राग निघतो तो सरकारवर, मग हॉस्पिटल्सवर आणि कधीतरी डॉक्टरांवर. जो ह्यातून गेलाय त्यालाच त्यामागचा उद्वेग कळेल. पण ही सगळी मंडळी रुग्णसेवेच्या वाळलेल्या झाडावरची सुकलेली पाने आहेत. एका मर्यादेच्या पलीकडे ते काहीही करू शकत नाहीत. वठलेला वृक्ष काय सावली देणार? त्यासाठी आधी ते झाड पुन्हा हिरवं करायला हवं. एक अलीकडे घडलेला किस्सा सांगतो. एका गावातल्या प्रथमोपचार केंद्रात माझ्या मित्राचा नुकताच डॉक्टर झालेला मुलगा त्याचं कर्तव्य करत होता. एक रुग्ण आला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं जाणवत होत. पण तिथे 'इसीजी' नव्हता. त्याने त्या रुग्णाचं पुनरुत्थान म्हणजे 'रेस्क्यूसाय...

परफेक्ट

      *सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला, त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.*        *अशीच एक सिरीयल बघत होते, त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून नोकरी करून मुलं सांभाळून शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती...*      *मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे... हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकल च्या डब्यात पण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेत सुद्धा सुरू असेल...*        *तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, "ए तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा अभ्यास, मोठ...

इमान

*निरागस आणि मनातल्या रामासोबतं इमान जपणारी ही माणसं....*  ➖➖➖➖➖➖ साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, *"व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?" मास्तर मंजे कंडक्टर.* मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं. *आरं देवा... मंग तिकीट??* त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय. *मग आता???* "तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही." *"दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.* *त्ये मरुदे तिकडं. वाचाय येत...

गरज...

एका मैत्रिणीच्या आईचे परवा ९५ व्या वर्षी निधन झाले.वडील आधीच निवर्तले होते. *६५ वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी,दोन लेक,आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला,प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष,कपाटे,तेवढे कपडे, कार्यप्रसंगी १०० माणसे जेवू शकतील एवढी भांडी,फर्निचर, बाग,हौसेमौजेने तीर्थयात्रा,पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे,आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज,वस्तू, सामान...पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न,यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली.* आईपश्चात वर्षभर रिकामे,प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच...! कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही,१०० माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही,जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही,मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही,बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही...असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढ...

काटकसर

➖➖➖➖➖➖ मंजिरी आणि राघव, नुकतच लग्न झालेलं एक नवं कोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्या कडेने मस्त  एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते. मंजिरीने त्याच्या कानात हळुच विचारलं, "राघव, तु टीप का नाही दिली त्या वेटरला."   "का त्याने तुला मागितली होती का?" राघवने तिला मिश्कीलपणे प्रतिप्रश्न केला.  "तसं नाही रे, मी दोनतीन वेळा आॅब्जर्व केलं की तु कोणाला टीप देत नाही, कंजूस कुठला?." राघव हलकसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेलाच एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा,अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती.  तीने चुलीवर पातेलं ठेऊन त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजुला टाकली. मंजिरी हे सगळं पहात होती आणि राघवचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं.  तिथून थोडंसं पुढे येत नाही की...

हयातीचा दाखला

दुपारची वेळ असेल. साधारण दोन अडीचची वेळ. बाहेर रणरणतं ऊन. नीरव का काय ती शांतता. उभी सोसायटी दुपारच्या झोपेत गुंगून आडवी झालेली.. मी सुद्धा. जवळ जवळ सगळी मंडळी घरीच. जरा डुलकी लागतेय तर सेलफोन कोकलला. फोन घेऊन मी बाल्कनीत गेलेलो. गॅलरीच्या एका कोपर्यात रेंज जरा व्यवस्थित येते. ठण्णकन् आवाज झाला. पहिल्या मजल्यावरच्या एका बाल्कनीच्या दारावर, एक दगड जोरात आदळला. तसा फार काही मोठा दगड नव्हता. असेल लिंबाएवढा. अरे पण काय हे ? आवाजानं बाल्कनीचा दरवाजा उघडला गेला. तणतणत एक म्हातारा बाहेर आला. खाली वाकून ओरडू लागला. एक दहा बारा वर्षाचा पोरगा असेल. सायकलवर टांग टाकून रफू चक्कर झाला. म्हातारा आपला हवेतल्या हवेत बोंबलतोय. त्याला कळतच नाहीये कुणी दगड मारलाय ते ? बाकी सोसायटीला याच्याशी काहीही घेणंदेणं नाहीये. एक तर कंपाऊडबाहेरून दगड आलाय. आपल्या बाल्कनीत तर नाही ना पडला ? छोड्डो यार.. सोसायटी फक्त या कुशीवरनं त्या कुशीवर. मीही फारसं लक्ष दिलं नाही. द्वाड पोरगं असेल एखादं. दोन दिवसांनंतरची गोष्ट. डिट्टो तसाच फोन आलेला. डिट्टो तीच वेळ. मी डिट्टो तसाच गॅलरीत उभा. अन् रिपीट टेलीकास्ट. सायकलवालं तेच द्व...

भेट (बक्षीस)

  ➖➖➖➖➖➖ एका उद्योगपतीचा मुलगा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होता. जेंव्हा त्याचे वडील त्याला परीक्षेविषयी विचारत असत,तेंव्हा तो उत्तर देताना वडिलांना म्हणत असे की, "पिताजी असं होऊ शकतं, की मी कॉलेजमध्ये प्रथम येईन, जर मी प्रथम आलो तर तुम्ही मला माझ्या आवडीची, ती महाग कार भेट म्हणून द्याल का?" वडील आनंदाने म्हणाले, "का नाही, अवश्य आणून देईन बेटा." हे त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. कारण त्यांना पैशाची काहीच कमतरता नव्हती. हे ऐकल्यानंतर मुलगा दुप्पट उत्साहाने अभ्यासाला लागला. रोज कॉलेजमध्ये येता- जाता, तो शोरूम मध्ये ठेवलेल्या कारकडे निरखून बघत असे आणि मनातल्या मनात कल्पना करत असे की तो आपली आवडती कार चालवत आहे. दिवस सरले आणि परीक्षा संपली. रिझल्ट आला, तो कॉलेजमध्ये प्रथम आला होता. त्याने कॉलेजमधूनच वडिलांना फोन करून सांगितलं की, " पिताश्री, माझं बक्षीस तयार ठेवा. मी घरी येत आहे." घरी येता येता, तो मनातल्या मनात  घराच्या अंगणात गाडी उभी असल्याचं स्वप्न रंगवत होता. ज्यावेळी तो घरी पोहोचला, त्याला तिथे कोणतीही कार दिसली नाही. तो नाराज मनानेच ...

मामा

मामा हा शब्द म्हणजे माया आणि माय यांचा मिलाफ, एक प्रेमाचा संबंध कोणतीही आणि कशीही परिस्थिती असो. *मामा* भले गरीब असेल पण मामाचे प्रेम सदैव श्रीमंतच राहणार. सर्वोतोपरी स्नेह म्हणजे द्विअक्षरीशब्द  *मामा* जबरदस्त व्यक्तीमत्व आईच्या खानदानातील निकटवर्तीय संबध. आईपेक्षा लहान असो मोठा असो, आई त्याला आदराने भाऊच बोलणार...  आपल्या आईच्या प्रत्येक हाकेला हातचे कामं सोडून धावत जाणार आणि तिच्या अधिकाराच्या प्रत्येक लढतीसाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिच्या सासरी झगडणारं व्यक्तीमत्त्व म्हणजे *मामा*. आपल्याला लहानपणी त्याच्या अंगा खांद्यावर खेळवणारं  खुळं स्वरूप म्हणजे *मामा*. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं जवळुन निरखून पाहणारं रुप म्हणजे *मामा*. आपणं आजोळी जातांना प्रवासात अथवा त्यांच्या घरी रात्रंदिवस कोणताही शारीरिक त्रास सहन करतांना वेदना न दाखवणारं हक्काचे माणुस म्हणजे *मामा*.... मामाची आठवण येताच मन हळवं झालं नाही असं कधीच घडत नाही. मामांनी दिवाळीच्या घेतलेल्या कपड्यांची ऐटच न्यारी...हमखास आणि अभिमानाने सांगत असतो हे कपडे मामांनी घेतले. कपडे खरेदीसाठी जातांना मामाच्या ठरव...

पिंपळ, आंबा आणि मुळाधार...

🙏🏽💚💚💚🥭💚💚💚🙏🏽 *आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे* *सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे..*बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले* *बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी.... होईल पुन्हा पूर्वीसारख रूप ... होशील माझ्यासारखा...* *शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना..* *अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन* *करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती..* *मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. प...

विकास

 *शालेय निकाल सोबत हे पण अवश्य वाचा अन आपल्या पालकांनाही वाचायला सांगा* 👉🏻 *जंगलाचा राजा सिंह याने एक फर्मान  काढले,  आजच्या नंतर कोणीही निरक्षर राहणार नाही.. सर्व प्राण्यांनी आपली बाळे नवीन शाळेत टाकायचे.* प्रत्येक प्राण्याला आपल्या मुलाला शाळेत पाठवावे लागेल.  राजे साहेबांच्या शाळेत शिक्षित झाल्यावर सर्वांना प्रमाणपत्र वाटण्यात येईल. फर्मान जाहीर झाले.        सर्व प्राण्यांनी आपापली  मुले शाळेत पाठवले. वाघाचे, उंट, जिराफ, हत्तीचे बाळ आले, माकड, मासे, ससा आणी  कासवाची मुले ही  आली.     शाळेत येऊन ऑगस्ट उजाडला अन   *प्रथम युनिट चाचणी परीक्षेतच हत्तीचे बाळ नापास झाले.*   हत्तीने, बाईना विचारले, "आमचे बाळ  कोणत्या विषयात नापास झाले...?"   "झाडावर चढण्यात अयशस्वी झाले."                                       *माकड वगळता सर्व प्राण्यांचे मुले या चाचणीत नापास झाले.*         ...

दर पिढीतील समतोल

🤓🥸🤓😎🥸😎 ➖➖➖➖➖➖ बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या  ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व  मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो. त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं, म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला  कोणते तरी तेल लावले होते. त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने, हाताचे ठसे भिंतीवर उमटले. ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो "बाबा, भिंतीला हात न लावता चाला ना जरा. तुमचे हात लागून त्या किती घाण होतात !"  माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटलं.  ऐंशी वर्षाचे बाबा, एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करुन मान खाली घालून गप्प बसले. छे! 'हे मी काय केले! मी असं नको म्हणायचं होतं असं वाटायला लागलं  माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्यानी भिंतीला धरुन चालणं सोडून दिले. पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले. त्यानी अंथरुनच धरले. पुढे दोन दिवसांनी त्यांनी इहलोक यात्रा संपविल...

हलधर नाग

 *दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत... "पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !* (शिक्षण फक्त तिसरी पास... नक्कीच वाचा...) ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त ! त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की, दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत "पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब ! अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची. कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय. साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत . हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो कर...