अविधवानवमी
*🔸.🔸* ====================== ====================== *"आजी कपाटाची चावी हवी आहे मम्मीला"...मी मोबाईल बघत बघत आजीला म्हटंले.* *"अरे! चावी मी काय कमरेला लावून फिरते का? फळीवर असेल बघ ना... मला आता आयुष्यात रस नाही उरलाय, तिथे कपाटाच्या चावीत काय रस असणार"..* *आजीने जरा चिडूनच मला उत्तर दिले.* *आजीचा चिडलेला स्वर ऐकून आजोबांनी घाईघाईत फळी वरील चावी माझ्या हातात देत म्हंटले,* *"तिचा उपास आहे ना आज... त्यामुळे भुकेने थोडी चिडचिड झालीय तिची. आणि तुझ्या मम्मीची पण कमाल आहे. चावी मागायची कशाला... अरे जेव्हा पाहिजे तेव्हा फळी वरून आम्हाला न विचारता सरळ घ्यायची की ".... आजोबांनी आजीला आज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. तितक्यात आजी पुन्हा चिडचिड करत म्हणाली,* *"उगाचच माझ्या भूकेच खोटं कारण सांगू नका. आठ महिन्यांपूर्वीच माझी भूक मेली आहे...."आजी पुढे काही बोलायच्या आत आजोबांनी मला खुणेनेच निघून जायला सांगितले.* *मी चावी मम्मीला नेवून दिली आणि आजीची चिडचिड सुध्दा सांगितली.* *मम्मीने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि ती कपाटाच्या दिशेने गेली.* *तसं तर आम...