महाराणी येसूबाई
*!!! महाराणी येसूबाई !!!*
भाग - २५.
खरोखर शंभूराजेंनी मराठा गोळा करण्याची कोशिश केली असती तर, ही स्वार्थी मतलबी मंडळी शंभूराजे विरुद्ध खवळून उठली असती. व " बंडाचे" नाव दिले असते. सोयराबाईही त्यांच्या मागे उभे राहिल्या असत्या. आबासाहेबांना मजबूर होऊन समशेर उपसावी लागली असती. जिच्या एकाच घावात शाहिस्तेखान्यांला आपली बोटे गमवावी लागली. ती समशेर कदाचित स्वपुत्राच्या रक्ताने....
येसूबाईंना ती कल्पनाही सहन झाली नाही. येसू, म्हणूनच आम्ही आमच्या माणसांना दूर ठेवले. व आमच्या मनसुब्याचा कोणाला पता लागू दिला नव्हता. दिलेरने शब्द दिला आणि आम्ही त्याच्यावर पुरा यकीन करून दोस्त मानले. पण येसू, काटा तो काटाच. टोचणे हा त्याचा गुणधर्म. भुजंगच तो जहर ओकणे त्याचा स्वभावधर्मच. हमेशाप्रमाणे दिलेर यवनाने हरामखोरी केलीच. येसू, आजही तो भोपाळगडचा किल्ल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. भुपाळगडावर दिलेरखानने हल्ला केला. दौलतीवर हमला करण्यास आमचा सख्त विरोध होता. दौलतीतला एवढासाही तुकडा आम्हाला नको होता. पण त्याने आम्हाला वेगळच समजावले. मराठ्यांचा पाडाव करण्यासाठीच तर दिलेरखानाची रवानगी दक्षिणेत झाली झाली होती. आपला मोर्चा त्याने दुसरीकडे वळवला असता तर आलमगीर दुखावला असता.
येसू, आत्मघातकी आलमगिराला दिलेरही विटला होता. तोही स्वतःचे राज्य दक्षिणेत उभं करायला उत्सुक होता.पण उघडपणे त्याला करणे शक्य नव्हते म्हणून तो म्हणाला, आम्ही आमची चाल बदलली तर आलमगीर आमच्यावर शक करेल. नुकताच शहजादा मुअज्जम दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबाद येथे पोहोचला आहे. त्याचे जवळ मुबलक सैन्य !अशावेळी आपला मोहरा बदलणं म्हणजे मौताला दावत देणे. म्हणून काही काळ मराठ्यांशी झगडा करण्याचा बहाणा करू. त्यामुळे शहाजाद्याला तुमचा यकीन येईल. संधी मिळताच उचित समयी आपला मोहरा बदलून मनसुबा फत्ते करू.
येसू, आम्ही आमच्या सुरम्य स्वप्नात मशगुल होतो. म्हणूनच दिलेरच्या गोड बोलण्याचे बळी ठरलो. आणि त्याचे सह भुपाळगडाकडे वळलो.व्यथित स्वरात म्हणाले, येसू, भुपाळगडावर आमची भेट फिरंगोजी काका नरसाळंशी झाली. ते वृद्ध असले तरी त्यांच्या अंगी रेड्याचे बळ. ते सहजासहजी दिलेरखानला हार गेले नसते. पण त्यांनी आम्हाला पाहिलं आणि त्यांचे बळच गेले. ते आपली तडफदारी, जिम्मेदारी सारे विसरले. भुपाळगड पडला. या मोहिमेत दिलेरखानने आमच्या सातशे मावळ्यांना पकडून त्यांचा एक हात व एक पाय तोडून सोडून दिले. या त्याच्या अमानुष कृतीने आमचे काळीज विदिर्ण झाले. मग स्वारी त्याच वेळी निघून का आली नाही? उलट स्वारींनी दिलेरखाना सोबत जातगिरी, तीकोटा, होनवड मार्गे अथवणीची मोहीम का केली? आमच्या कानावर आले की स्वारींनी दिलेरखा समवेत मार्गातली गाव न् गाव उध्वस्त केले. अनेक हिंदू कैद केले. शिवाय त्यांचे हाल.... नामुमकीन! यातलं आम्ही काहीच केलं नाही. उलट त्याला सतत असे न करण्याबाबत विनवत होतो. त्याचे वर वचक ठेवायचा प्रयत्न करीत होतो. पकडलेले हिंदूंंना सोडण्यासाठी आग्रह करीत होतो. येसू, आम्ही सर्व भोगले. स्वकियांचा आक्रोश आमच्याच दिलात जखम करून गेला. आणि आम्ही गलती केल्याची जाणीव झाली. हे थांबवायचं असेल तर याची साथ सोडायला हवी असा फैसला केला.
येसू,, नव राज्य निर्माण करून आबासाहेबांची एक चिंता मिटवण्याचा आमचा यामागे मानस होता. दिलेर ने शब्द दिल्याप्रमाणे वागला असता, हरामखोरी केली नसती तर.... पण आमचं यश नियतीला मान्य नव्हतं. अजून आमचं दुर्दैव संपलं नव्हतं. आमचं चरित्र कलंकित व्हावं असं नियतीच्या मनात होतं. आम्हाला ते टाळता आलं नाही. खरंच नाही टाळता आलं .
येसूबाई म्हणाल्या, स्वारींनी आता हे सार मनातून काढून टाकावं. कसं काढू येसू? काळजावर झालेल्या जखमा बुजत नाही आणि आम्ही बुजवण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक बुजू देत नाही. आम्ही गलती करून त्यांच्या हाती कोलीतच दिले. येसू, तुम्हाला आमच्यासारखा नादान साथी मिळाल्याचा पश्चाताप तर होत नाही ना? कोण म्हणतंय आपण नादान आहात? स्वारी, आम्ही रयतेत वावरतो. रयतेचे दिल आम्ही जाणतो. माणसाची अचूक पारक आहे त्यांच्याकडे. त्यांचे मनात स्वारीबद्दल प्रेम आदर आहे. रयत अजूनही स्वारींना मानते. येशुबाईच्या शब्दांनी त्यांचा धीर वाढला. त्या त्यांच्या छातीवर डोके ठेवून स्थिरावत म्हणाल्या, स्वारींनी आमचं फक्त एक ऐकावं...सांग येसू, आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाही.
येसूबाई म्हणाल्या, शिलेदारी म्हणजे जीवन मृत्यूचा खेळ असला तरी, त्यातल्या धोक्यापेक्षा राजकारणातील गुंता अधिक अवघड, विकट आहे. यातून सही सलामत सुटायचे असेल तर विकारांना आवर घालायला हवे. भावनांना विवेकाने बांधायला हवे. तोंडातून जपून शब्द काढायला हवे. आणि हे जमायलाच हवे. या पुढचा काळ आणखी अवघड बनला आहे. कळत नकळत स्वारींकडून जी गलची झाली, त्यामुळे हितशत्रूंना मोक्का मिळाला आहे. अशावेळी स्वारी स्वतःला रोखू शकली नाही तर, गुंता अधिकच वाढेल. त्यामुळे स्वारींबरोबर आबासाहेबांच्या दुःखाचे कारक बनतील.
येसू, आम्ही तुम्हाला वचन देतो, यापुढे आम्ही स्वतःला आवरून भावना ताब्यात ठेवून तोलून मापून बोलू. वरिष्ठ दुखावतील असा बर्ताव करणार नाही. शिवाय आबासाहेबांना दुःख होईल, त्यांची बेचैनी वाढेल असं आमच्या हातून होणार नाही. येसू, खरंच यकीन करा. एवढे बोलून ते महालाबाहेर निघून गेले. आणि येसूबाईंच्या मुखावर शंभुराजे यांच्या मनातील जळमट दूर करू शकल्याचे समाधान विलसले.
क्रमशः९.९.२४
संकलन, देशमुख.
Comments
Post a Comment