हसतीखेळती बायको
हसतीखेळती बायको...*आपल्या घरात असणं हे केवढं मोठं वैभव आहे,हे बऱ्याच जणांना कळतचं नाही.बऱ्याच जणांना ते उशिरा कळतं आणि वळतं.काही जणांना कळतं,पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो.*
*घरातली स्त्री हसतीखेळती असेल,खुश असेल तर घराच्या भिंती खुश असतात,घरातली वास्तुदेवता खुश असते आणि देवघरातील देव पण खूष असतात आणि यामुळे घराला घरपण येतं आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं."आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे" असेच वातावरण अशा घरांमधे कायम असते.*
हे इतकं सोपं असूनही बहुतेक घरांमध्ये आनंदी आनंद का नसतो?ताण-तणाव का असतात ??याचं उत्तर लक्षात आले असेलच.
*सकाळी उठल्यानंतर चहा पितांना पेपर वाचू नका,बातम्या ऐकू नका,मोबाईल वर फेसबुक - व्हाट्सअप बघू नका.चहा पितानांची वेळ बायको करता रिझर्व ठेवा.आपण बातम्या थोड्या उशिरा वाचल्या,तर कुठेही आकाशपाताळ एक होणार नसते.आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्या,तर त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट कोसळणार नसते आणि घडलेल्या घटना बदलणार नसतात हे अगदी सरळ आहे.*
वाटल्यास दोन दिवस अनुभव घेऊन बघा...
आपल्याकडे म्हण आहे - देर आये दुरुस्त आये.*नंतर मात्र चहा पितानांची वेळ बायको करता रिझर्व म्हणजे रिझर्व.*
चहा पितांना बायकोशी चार गप्पा करा,चहा छान झाला असेल तर तसे सांगा.काल गेलेल्या दिवसातल्या चांगल्या घटनांची थोडी उजळणी करा.मुलांबद्दल गप्पा मारा,सासु सासऱ्यांबद्दल गप्पा मारा,बायकोचे आईवडिल - भाऊ बहीण यांच्या बद्दल गप्पा मारा.तिचं ऑफिस - आपलं ऑफिस यावर थोडं बोलता येतं. काही चांगले लेख वाचण्यात आले असतील,तर ते शेअर करा. वगैरे वगैरे वगैरे वगैरे....
रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात.अंघोळ झाल्यानंतर सगळेच फ्रेश दिसतात,छान दिसतात.*आज एकदम मस्त दिसतेस,असं बायकोचं कौतुक करा.बायकोच्या एखाद्या ड्रेसचं कौतुक करता येतं,एखाद्या साडीचं कौतुक करता येतं.*
अधून मधून जेवणामधे एखाद्या आयटमची फरमाईश करा. आमटीत थोडं मीठ जास्त झालं असेल,तर भाजी छान झाली आहे,असं भाजीचं कौतुक करा.
बायको कडे बघून...
*"हमे और जीने की,चाहत ना होती,अगर तुम ना होते,अगर तुम ना होते". हे गाणं म्हणून बघा.*
किंवा....
*"जो तुमको, हो प...सं..द, वही बात कहेंगे,*
*तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे"* हे गाणं म्हणून बघा....
एखाद्या दिवशी बायको म्हणतेय म्हणून दिवसाला रात्र म्हटलं किंवा रात्रीला दिवस म्हटलं तर स्वतःला काही फरक पडणार आहे का?
*उत्तर आहे नाही..पण बायको खुश होणार हे नक्की.*
घरातली स्त्री खुश असेल - हसती खेळती असेल,तर घरामधले सगळेच खुश असतात,आनंदात असतात.म्हणजेच आपल्या घरामध्ये-आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. आयुष्यात आपल्या सगळ्यांना अजून काय पाहिजे असतं.?
*पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची कार्तिकेय बरोबरची खडतर शर्यत गणपतीने आई-वडिलांना प्रदक्षिणा करून जिंकली होती.तसाच हा सोपा मार्ग आहे.*
*चला तर मग...आयुष्याची शर्यत जिंकण्याचा सोपा मार्ग आपल्याला सापडला आहे.*
*शुभ काम मे देर नही करते.*
*Happy wife! Happy Life!*😊
Comments
Post a Comment